वैजापूर : पाईपलाईनच्या वादातून शेतकऱ्याला दगडाने मारहाण

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) पाईपलाईन कारणावरून तालुक्यातील जानेफळ येथे शेतातील करण्याच्या झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद माधवराव जगदाळे (वय ५०, रा. जानेफळ) यांच्या घरासमोर
आरोपी नानासाहेब विठ्ठल जगदाळे याने येऊन शिवीगाळ केली. तसेच शेतात पाईपलाईन कशी करतो, ते पाहतो, असे म्हणत वाद घातला. यावर फिर्यादी यांनी गावातील चार असे सांगितले असता आरोपीने लोकांना बोलावून समस्या मिटवू, तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या छातीवर मारून दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

दरम्यान, आरोपी दादासाहेब नानासाहेब जगदाळे व अविनाश नानासाहेब जगदाळे यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला
मारहाण करून जीवे मारण्याची पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास स.पो. निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर आघाडे करीत आहेत. चापट-बुक्क्यांनी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.